मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा सरकारला इशारा, म्हणाले…

On: December 15, 2022 3:21 PM
---Advertisement---

मुंबई | रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन हे बुधवारी भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली.

पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. जगभरात विकासाची गती मंदावली आहे. भारतावरही याचा परिणाम होणार आहे, असा इशाराही राजन यांनी सरकारला दिलाय.

कोरोना महासाथीच्या काळात मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्गाला मोठा फटका बसला. या वर्गाला विशेष लक्षात घेऊन धोरण आखणे गरजेचे आहे. लघु उद्योग आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचं सांगत त्यांनी हरीत ऊर्जा वापरावरही भर दिला आहे.

श्रीमंतांना कोणतीही आर्थिक अडचण जाणवली नाही. गरीब वर्गाला रेशन आणि इतर गोष्टींची मदत मिळाली. पण, निम्न मध्यमवर्गाचे मोठे नुकसान झालं, असं राजन यांनी सांगितलं.

नोकऱ्या नसल्याने बेरोजगारी वाढली आणि त्याचा परिणाम झाला असल्याचं सांगत त्यांनी सरकारने या निम्नमध्यमवर्गासाठी धोरण आखावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now