कट्टर राजकीय विरोधक एकाच मंचावर; ‘बंटी-मुन्ना’ एकत्र

On: October 21, 2023 6:16 PM
---Advertisement---

कोल्हापूर | कोल्हापूरात (Kolhapur) कट्टर राजकीय विरोधक एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे एकाच मंचावर बघायला मिळाले आहेत. त्यामुळे या घटनेची कोल्हापुरात जोरदार चर्चा होत आहे. 

कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी हा योग जुळून आलाय. या कार्यक्रमाला तीनही नेते एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं. शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य घेणार, असं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा एकाचवेळी फेटा बांधत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मी जेव्हा असेन त्यावेळी ही दोघं मंडळी असणार. त्यामुळे विकास करण्यासाठी दोघांचं सहकार्य आम्ही निश्चितच घेऊ, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now