दुबईत संगीत सेरेमनी तर लंडनमध्ये सातफेरे, ‘असा’ होणार राधिका-अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा

On: April 24, 2024 11:58 AM
Radhika-Anant Ambani Wedding
---Advertisement---

Radhika-Anant Ambani Wedding | जागतिक पातळीवरील आघाडीचे आणि नामवंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची होणारी सून राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा जामनगर येथे पार पडला.

बिल गेट्सपासून जुकेरबर्गपर्यंत नामवंत दिग्गजांची मांदियाळी या सोहळ्यात दिसून आली. अगदी कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत, सजावट पासून ते जेवणाच्या मेन्यूपर्यंत सगळं काही शाही थाटात दिसून आलं. प्री-वेडिंगसाठीच पाण्यासारखा पैसा खर्च झाला अजून तर लग्न बाकीये.मग, लग्नात किती पैसे खर्च केले जातील, याचा अंदाज न लावलेलाच बरा.

राधिका-अनंत अंबानी कुठे करणार लग्न?

नुकतीच काही मिडिया रिपोर्टनुसार राधिका आणि अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याची तारीख समोर आली आहे. 12 जुलै 2024 रोजी दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा काही मिडिया रिपोर्टने केला आहे. मात्र, त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत कोणतीही माहिती अंबानी कुटुंबाने शेअर केलेली नाही.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह विदेशात होणार असल्याचं म्हटलं जातंय. लंडनच्या स्टॉक पार्क हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. तर, संगीत सेरेमनी ही अबू धाबीमध्ये होणार आहे. लंडनमधील स्टॉक पार्क या हॉटेलला मुकेश अंबानी यांनी 592 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. 300 एकरमध्ये असलेलं हे आलीशान हॉटेल अगदीच महालासारखं आहे. त्यात अनेक सुविधा (Radhika-Anant Ambani Wedding) आहेत. यात तलाव, ऐतिहासिक गार्डन्स, कंट्री कल्ब अशा अनेक सुविधा आहेत.

‘या’ दिग्गजांना दिलं जाणार आमंत्रण?

यासोबतच स्पा, पूल, मॉन्यूमेंट्स आणि 49 लग्जरी आणि मोठ्या खोल्या आहेत. या आलीशान हॉटेलमध्ये 5 रेस्टोरेंट, जिम, फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल आणि 13 टेनिस कोर्ट देखील आहेत. याच हॉटेलमध्ये हॉलीवुड चित्रपट जेम्स बॉन्डची शूटिंगदेखील झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार (Radhika-Anant Ambani Wedding) अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न सोहळ्यात बॉलीवुड पासून विदेशी मंडळी सामील होणार आहे. यात शाहरुख खान-सलमान खान, बच्चन परिवार, विराट कोहली, अनुष्का शर्मा, विक्की कौशल, अनिल कपूर यांच्यासह अनेकांची नावे सामील आहेत.

News Title : Radhika-Anant Ambani Wedding

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळीचा तडाखा बसणार, हवामान विभागाचा इशारा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाईक घ्यायची? तर भन्नाट फीचर्ससह ‘ही’ नवीन बाईक येतेय बाजारात

‘अमरावतीत हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?,संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

Join WhatsApp Group

Join Now