IPL Auction 2024 | रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात, मोजले ‘इतके’ कोटी रुपये

On: December 19, 2023 2:17 PM
IPL Auction 2024 : Rachin Ravindra
---Advertisement---

 IPL Auction 2024 | न्यूझिलंडचा स्टार क्रिकेटपटू रचिन रवींद्रने नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती, यंदाच्या आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं होतं. अखेर याचं उत्तर मिळालं आहे.

रचिन रवींद्रला मिळाली किती किंमत?

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Supar Kings) रचिन रवींद्रला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. चेन्नईनं त्याच्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत. रचिनला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि दिल्लीच्या (Delhi Capitals) संघांमध्ये चुरस लागली होती. 

Rachin Ravindra IPL Auction 2024 for Chennai Super Kings

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात खेळणार-

अखेरीस चेन्नई सुपर किंग्सनेच त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं. त्यामुळे रचिन रवींद्र आता धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना पहायला मिळेल.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंसाठी चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी संघ मालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

New Zealand Cricketer Rachin Ravindra IPL Auction 2024 Price 1.80 Cr

महत्त्वाच्या बातम्या-

Indian Premier League | Rovman Powell वर लागली पहिली बोली, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

Sharmila Thackeray | “मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?”

Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

Naveen-Ul-Haq | मोठी बातमी! ‘या’ स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now