प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा’चा जलवा, कमावले तब्बल 500 कोटी रुपये

On: April 19, 2024 4:55 PM
Pushpa 2 Digital Rights Sold Out To Netflix 
---Advertisement---

Pushpa 2 | साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड केले. आता चित्रपटाचा दूसरा पार्ट येणार आहे.

‘पुष्पा- द राईज’च्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा- द रुल’ ची घोषणा केली आहे. याचा टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे. 8 एप्रिलरोजी चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनचा वाढदिवशी चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज झाला. यात अल्लू अर्जुनचा हटके लुक पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाबद्दल अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा 2’ने कमावले 500 कोटी

हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे चार महिने असतानाही त्याने तब्बल 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’चे (Pushpa 2) डिजिटल राइट्स विकले गेले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे राइट्स विकत घेतले असून त्यातूनच चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 500 कोटींचा गल्ला कमवला आहे.

तब्बल 250 ते 300 कोटी रुपयांची यासाठी डील करण्यात आल्याची माहिती आहे. सर्व भाषांमधील चित्रपटांसाठी ही डील करण्यात आली आहे. तर फक्त हिंदी भाषेतील डिस्ट्रिब्युशनचे राइट्स तब्बल 200 कोटी विकले गेले आहेत. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने ‘RRR’ लाही मागे टाकलं आहे. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाचे डिजिटल राइट्स तेव्हा 170 कोटी रुपयांना विकले गेले होते.

Pushpa 2 चा टीजर रिलीज

दरम्यान, पुष्पाच्या दुसऱ्या पार्टच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनच्या लुक आणि अॅक्शन सीन्सची जोरदार चर्चा आहे. पुष्पा: द रुलच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहे. साडी, दागिने आणि फुल मेकअपसह पुष्पाच्या लूकने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. 1 मिनिट आणि 8 सेकंदांच्या या टीझरमध्ये डोक्यापासून पायापर्यंत अल्लू अर्जुन आपल्या लूकने आश्चर्यचकित करत आहे. टीझरमधील त्याच्या अॅक्शनमधून पुष्पा राजच्या पॉवर पॅक्ड परफॉर्मन्सची झलक पाहायला मिळते.

या चित्रपटातील पोस्टरनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता अल्लू अर्जुनचा पूर्ण लुक निर्मात्यांनी उघड केला. याचा टीझर (Pushpa 2) तब्बल 110 मिलियन जणांनी बघितला आहे. बहुचर्चित असा हा ‘पुष्पा 2’ चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तामीळ, तेलुगू, हिंदी आणि इतर भाषेतही हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.याच्या पहिल्या पार्टने बरीच कमाई केली होती. आता चाहते याच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट बघत आहेत.

YouTube video player

News Title: Pushpa 2 Digital Rights Sold Out To Netflix 

महत्त्वाच्या बातम्या –

मला मूल असण्याची गरज वाटत नाही, कारण… अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं वक्तव्य चर्चेत

भाजपला पराभवाची धास्ती!, जे लीड देणार नाहीत त्यांना… थेट आमदारांना मिळाली तंबी

पुण्यात दारुचा पूर, अबब!!! पुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारु

मला शक्तिप्रदर्शनाची अजिबात गरज नाही!, नारायण राणेंनी सांगितलं कारण

Yamaha ने लाँच केली चावीशिवाय सुरू होणारी स्कुटर; जाणून घ्या किंमत

Join WhatsApp Group

Join Now