पुण्यात पीएमटी चालकाने गाड्यांना उडवलं, लोकांना आठवला संतोष माने

On: October 22, 2023 3:28 PM
---Advertisement---

पुणे | पुण्यात लाखो लोक PMPML ने प्रवास करत असतात. प्रवाशांसाठी PMPML कायम सेवा देत असते. दरम्यान याच PMPML बसच्या एका चालकाने वाहनांना उडवल्याची धक्कदायक घटना पुण्यात घडली आहे. PMPML च्या चालकाने मद्यपान करून बस चालवल्याने भीषण अपघात झाला आहे.

पुणयातील सेनापती बापट रोडवर झालेल्या आपघातात PMPML च्या बस चालकाने दारुच्या नशेत तब्बल 10 ते 15 गाड्या उडवल्या आहेत. एका वाहन चालकाशी वाद झाल्याने PMPML बस चालकाने या गाड्यांना उडवलं आहे. निलेश सावंत असं या बस चालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही बस वारजे माळवाडीच्या दिशेने जात होती. बसमध्ये ऐकून 50 प्रवासी होते.

बस चालकाने दारूच्या नशेत बस उलटी चालवल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी आणि स्थानकांनी केला आहे. दरम्यान निलेश सावंत याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये 308 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वाहान चालकाशी वाद झाल्याने रागाच्या भरात हा प्रकार घडला असल्याचं माध्यमांच्या माहितीनुसार समोर आलं.

बस रिव्हर्स घेत चालकाने काही गाड्यांनाही उडवलं आहे. ही घटना घडत असतानाच बसमधील प्रवाशांनी ओरडून मदत मागितली. पण बस चालकाने बस थांबवली नाही. यामध्ये काही गाड्याचं नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now