Pune Weather | देशात यंदा प्रचंड थंडी पडली होती. उत्तर भारतात तर थंडीमुळे बऱ्याच जणांना आपला जीवही गमवावा लागला. महाराष्ट्रातही थंडीचा पारा चांगलाच वाढला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दुपारून उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र सकाळी आणि रात्री गार वारे वाहत आहेत. पुण्यातही (Pune Weather) रात्री गारठा वाढला आहे.
पुण्यात पुन्हा शेकोट्या पेटणार
त्यामुळे सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उन्हाचे चटके असे वातावरण तयार झाले आहे. याचा आता आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यात या आठवड्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तवला. त्यामुळे शहरात (Pune Weather) पुन्हा थंडीचा कडाका वाढणार आहे.
राज्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद पुण्यात 11.6 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. त्यामुळे पुण्यात आता पुन्हा शेकोट्या पेटवाव्या लागणार आहेत.
पुण्यात ‘अशी’ वाढली थंडी
पुण्यात (Pune Weather) आठवड्यातच किमान तापमानात घसरण झाली आहे. शिरूरमध्ये 9 अंश अंश सेल्सिअस, हवेलीमध्ये 10.4 अंश सेल्सिअस, एनडीए 11. 6 अंश सेल्सिअस, शिवाजीनगर 11.6 तर पाषाणमध्ये 12.9 अंश सेल्सिअस अशी तापमान फेब्रुवारी मध्ये राहिले.
राज्यात काही भागांत मुसळधार पाऊस
मध्यभारतात तयार झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन ‘मुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. शनिवारी यवतमाळ, अमरावती व वर्धा जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुदखेड आणि किनवट तालुक्याला रविवारी वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला.
त्यामुळे हवामान विभागाने नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.
News Title- Pune Weather Pune will get cold again
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!
पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार
शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video






