Pune water supply cut | पुणे शहरात पाणी समस्या संपण्याचं काही नाव घेत नाहीये. आता पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे (pune municipal corporation water supply) देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने काही भागातील पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे.
आता उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस पडतोय. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यातच पाणी टंचाईही जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पुणे महानगर पालिकेने के.के.मार्केट परिसर, बिबवेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्काॅन मंदिर येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे बुधवारी म्हणजेच 6 मार्चरोजी काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पुणेकरांनो पाणी जपून वापरा
पुण्यातील के.के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, राजीव गांधीनगर, अप्पर आणि सुप्पर इंदिरानगर, कोंढवा बुद्रुक, कात्रज आणि कोंढवा यासह दक्षिण पुण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.
या ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 मार्चरोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. पालिकेनंही पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.
बुधवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा बंद
कोंढवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर, सुप्पर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, माळवे गार्डन परिसर, श्रेयसननगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, गुलमोहर काॅलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर डेपो, महानंदा सोसायटी परिसर, गुरूकृपा काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, श्रीकुंजनगर, पुण्याईनगर, बालाजी नगर, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर आणि लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज परिसर, राजयोग सोसायटी परिसर, लोकेश सोसायटी, विश्वशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, हस्तीनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी परिसरा, स्टेट बँक काॅलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजापार्क, लेकटाऊन, चैत्रबन वसाहत, चिंतामणीनगर भाग एक आणि दोन या भागाचा पाणीपुरवठा बुधवार म्हणजेच 6 मार्चरोजी बंद असणार आहे.
News Title : Pune water supply cut on March 6
महत्त्वाच्या बातम्या-
महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका
‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!
धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण
अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल






