पुणेकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

On: November 18, 2025 10:17 AM
Vasai Virar Water Cut
---Advertisement---

Pune Water Shutdown | पुणेकरांना गुरुवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. कारण शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पाण्याची व्यवस्थापन नीट करण्याची गरज आहे. पाणीपुरवठा पुनर्संचयन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे ही बंदी करण्यात येत आहे. (Pune Water Shutdown)

शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याशी संबंधित मोठ्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत अनेक भागांतील पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विशेषतः शुक्रवारी सकाळीही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असा सल्ला अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांना वेळेआधी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

या जलकेंद्र परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद :

पालिकेच्या माहितीनुसार नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, बडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एमएनडीटी HLR, SNDटी MLR टाकी परिसर, चतु:शृंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज 1 आणि 2, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र आणि नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागांमधील रहिवाशांना पाण्याचा पुरवठा गुरुवारी मिळणार नाही.

खडकवासला धरणापासून (Khadakwasla dam) पर्वती जलकेंद्रापर्यंत 3000 मिलीमीटर व्यासाची रॉ वॉटर पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. आता या पाइपलाइनशी जोडलेल्या दोन 1400 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईन्सवर दुरुस्ती आणि फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. याचसोबत 1400 मिलीमीटरच्या लाईनवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसविणे आवश्यक असल्याने गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. या मोठ्या दुरुस्तीमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे, मात्र ही कामे भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune Water Shutdown | नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा :

गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद आणि शुक्रवारी कमी दाबाचा पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी आगाऊ नियोजन करण्याची गरज आहे. विशेषतः कुटुंबातील वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाठी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा ठेवणे महत्त्वाचे आहे. वारंवार पाण्याचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे. (Pune Water Shutdown)

प्रशासनाने शहरातील नागरिकांना या देखभाल कामांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, आवश्यक नसलेल्या पाणीवापरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन दिवस पाण्याची समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Pune Water Cut on Thursday: Major Areas to Face Full Supply Shutdown

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now