डिलिव्हरी बॉय घरात घुसला अन्…., पुणे हादरलं!

On: September 7, 2023 4:03 PM
---Advertisement---

पुणे | पुणे शहरातील वाकडेवाडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. डिलिव्हरी बॉयने (Delivery boy) संबंधित युवतीकडे शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय. डिलिव्हेरी बॉयने (Delivery boy) मोबाईल फोन चार्ज नाही, असं सांगत घरात प्रवेश केला. त्यानंतर युवती घरी एकटी असल्याचं पाहून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली.

नेमकं काय घडलं?

वाकडेवाडीत एका उच्चभ्रू सोसोयटीत राहणाऱ्या युवतीने स्विगीवरुन काही सामान मागवलं. ते सामान तपासत असताना सॅनिटरी पॅडचं पॅकेट फुटलेलं. तिने यासंदर्भात स्विगीकडे तक्रार केली. यानंतर नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन डिलिव्हरी बॉय आला. त्यावर डिलिव्हरी बॉयने तरूणीकडे पैशांची मागणी केली.

तरुणीने स्विगीशी बोलून घे असं सांगितलं. यानंतर त्याने फोन फोन चार्ज नाही सांगत घरात प्रवेश केला. आणि शरिरसुखाची मागणी केल्याचं या युवतीने सांगितलं. डिलिव्हरी बॉयने तुम सेक्स करोगी?, असं म्हणत तरूणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत युवतीने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार केलीये. यानंतर स्विगीच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now