Pune | पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: November 24, 2023 10:04 AM
---Advertisement---

पुणे | पुणे शहरात (Pune) यंदा पाणी कपातीचे संकट आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली नाही. यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची पुन्हा टांगती तलवार होती.

पुण्यात होणार पाणी कपात

अखेर याबाबत निर्णय घेण्यात आलाय. डिसेंबरपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा पाहता जलसंपदा विभागाने पुणे शहरात पाणीकपात करण्याची सूचना महापालिकेला दिली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या पाणीकपातीच्या सूचनेनुसार महापालिकेने नियोजन करणं अपेक्षित आहे. डिसेंबरपासून सुरू होणारी पाणीकपात जुलै महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कालवा समितीची बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. बैठकीत सर्व धरणांचा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, यंदा पाऊस कमी झाला आहे. परंतु सध्या खडकवासला धरणात जलसाठा चांगला आहे. तसेच पवना आणि चासकमान धरण 100 टक्के भरली आहे. भामा आसखेडमध्येही जलसाठा आहे. यामुळे तूर्त पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील महिन्याभरात पाऊस किती पडतो? हे पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now