पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाढत्या ट्रॅफिकमुळे मोठा निर्णय

On: March 5, 2024 3:24 PM
Navi Mumbai Traffic Update
---Advertisement---

Pune traffic News | गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरामध्ये ट्राफिकमुळे (Pune traffic News) वाहन चालकांच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा अडथळा निर्माण झालेला पाहायला मिळतो. यामुळे आता ट्राफिकचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून त्यावर आता पुणे पोलिसांनी तोडगा काढला आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणेश खिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होत आहे. याआधी या रस्त्यावरून अनेक जड वाहनांची वाहतूक होत होती. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक (Pune traffic News) समस्या निर्माण होताना दिसत आहे. मात्र आता पोलीस प्रशासनाने ट्राफिकची (Pune traffic News) समस्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी जड वाहनांना पुणे शहरामध्ये प्रवेश करण्यापासून बंदी घातली आहे.

पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनी या विभागामध्ये जात पाहणी केली आहे. कालपासून पुणे विद्यापीठ विभागामध्ये जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

काय म्हणाले पोलीस वाहतूक आयुक्त?

पोलीस आयुक्त नितेश कुमार म्हणाले की, सध्या पुण्यामध्ये वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. काही महिन्यांपासून पायाभूत सुविधा म्हणजेच मेट्रोची समस्या सुरू आहे. त्या वाहतुक कोंडीमध्ये अधिक भर पडताना दिसत आहे. पुणे शहर आणि पुणे विभागामध्ये वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आली होती. काही दिवसांआधी विद्यापीठ परिसरामध्ये भेट दिली होती. त्यावर उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

अत्यावश्यक जड वाहनांवर बंदी नाही

जड वाहनांना गणेशखिंड रस्त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा असणाऱ्या जड वाहनांना बंदी नसणार आहे. काही अपवादात्मक जड वाहनांना बंदी नसणार असल्याचं पोलीस आयुक्त नितेश कुमार म्हणाले आहेत.

त्यानंतर जड वाहनांना बंदी घातली असली तरीही पुणेकरांच्या ट्रॅफिकबाबत तक्रारी आहे, असं विचारल्यानंतर पोलीस आयुक्तांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, गणेशखिंड रस्त्यावरील 45 ते 60 टक्के रस्ता हा मेट्रोच्या कामासाठी वापरला गेला आहे. दररोज चाकरमानी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत कामावर जात असतात यामुळे गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, असं पोलीस आयुक्त म्हणाले आहेत.

News Title – Pune traffic News update

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!

गर्भपाताला घटनात्मक अधिकार! ‘या’ देशाचं मोठं पाऊल; असं करणारा ठरला जगातील पहिला देश

टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरी पोलिसांचा छापा; पैशांनी भरलेली बॅगेसह ‘इतके’ कोटी जप्त

वाद चिघळला! कंगनाचे गंभीर आरोप अन् इमरान हाश्मीचे चोख प्रत्युत्तर

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा

Join WhatsApp Group

Join Now