शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या…

On: February 19, 2024 11:02 AM
Pune Traffic News
---Advertisement---

Pune Traffic News | छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण असणार आहे. याचपार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्ता याठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे. (Pune Traffic News)

शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

छत्रपती शिवाजी रस्त्यावर मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीत स्वराज्य रथ स्थापन करण्यात येणार आहे. मध्यभागातील प्रमुख रस्त्यावरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी सातनंतर वाहतूकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती वाहतुक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी माहिती दिली आहे. (Pune Traffic News)

जिजामाता चौकाकतून स्वारगेटकडे….

जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाताना मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जावे. गणेश चौकाकडून जिजामाता चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी दारूवाला पूल चौकातून वळत आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं जावं. तसेच केळकर रस्त्याहून आप्पा बळवंत चौकाहून गरज पडल्यास बुधवार चौकाकडे वाहतूक वळवण्यात येणार आहे. (Pune Traffic News)

लक्ष्मी चौकातून ही शिवजयंती मिरवणूक निघणार असल्याने ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. टिळक रस्त्यावरून पूरम रस्त्यावरून बाजीराव चौकाकडे जाणाऱ्यांनी अलका चित्रपटगृह, खंडोबा चौक आणि डेक्कन जिमखानामार्गे जावं.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरून सकाळी लवकर मिरवणूकीला सुरूवात होईल. यावेळी मध्यभागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी नारायण पेठ, शनिवार पेठ ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून इतर ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा आहे.

पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे. पुणे शहरात काही वर्षांपासून वाहतुकीच्या समस्या होताना दिसत आहेत. यामुळे शिवजयंतीला वाहतूकीमुळे खोळंबा होऊ नये. जयंती निमित्त भव्य मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडावी म्हणून पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाबाबत दखल घेतली आहे.

News Title – Pune Traffic news update

महत्त्वाच्या बातम्या

पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून

मोठी बातमी! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

iPhone वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘या’ लोकांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, बातमी वाचून झोप उडेल

 

Join WhatsApp Group

Join Now