पुण्यात फिरण्यासाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक?, ‘या’ 22 ठिकाणांसाठी कडक नियमावली जारी

On: August 19, 2025 1:35 PM
Pune Tourism Booking
---Advertisement---

Pune Tourism Booking | पुणे जिल्ह्यातील पर्यटनप्रेमींना आता काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. सिंहगड, राजगड, तोरणा, ताम्हिणी घाटासह एकूण 22 पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी ‘ऑनलाइन बुकिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. गर्दीमुळे होणाऱ्या दुर्घटना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Pune Tourism Booking)

अलीकडेच मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले. पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, तसेच अव्यवस्थित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढे या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांना संबंधित वेबसाइट किंवा अॅपवर वेळेचा स्लॉट बुक करावा लागणार आहे.

22 ठिकाणांसाठी लागू होणार बुकिंग नियम :

या नव्या व्यवस्थेत सिंहगड किल्ला, राजगड, तोरणा, शिवनेरी किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा, नाणेघाट, मढे घाट, ताम्हिणी घाट, पावना डॅम, भुशी डॅम, टायगर पॉईंट, अंधारबन, बनेश्वर, मिल्कीबार धबधबा यांसारख्या प्रमुख स्थळांचा समावेश आहे. तसेच भिगवण पक्षी अभयारण्य, शिर्सुफल व कदमबानवाडी गवताळ प्रदेश, लोणावळा व कर्जत परिसरातील काही धबधबे आणि घाटवाटा देखील या यादीत आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या सर्व ठिकाणी जाण्यापूर्वी पर्यटकांना ऑनलाइन स्लॉट बुक करणे बंधनकारक असेल. ठराविक संख्येपेक्षा अधिक लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होईल, पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि स्थानिक प्रशासनालाही नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.

Pune Tourism Booking | पर्यटकांना कसा होणार फायदा? :

या नियमावलीमुळे पर्यटकांना गर्दी टाळून नियोजित प्रवास करता येणार आहे. पावसाळ्यात नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी टाळली जाईल आणि नैसर्गिक ठिकाणांचा अनुभव अधिक शांत, सुरक्षित व आनंददायी बनेल. डिजिटल बुकिंगमुळे पारदर्शकता वाढेल आणि बेकायदेशीर पद्धतीने होणारी पार्किंग व तिकीटविक्री थांबेल. (Pune Tourism Booking)

प्रशासनाने इशारा दिला आहे की, बुकिंगशिवाय या ठिकाणी पोहोचणाऱ्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येईल. त्यामुळे लवकरच सुरू होणाऱ्या या ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेबाबत प्रत्येकाने आधीच माहिती करून घ्यावी. पुणेकरांसह मुंबई, ठाणे आणि इतर शेजारील भागातून येणाऱ्या पर्यटकांनी नियोजनपूर्वक प्रवास करणे आवश्यक आहे.

News Title: Pune Tourism Update: Online Booking Made Mandatory for 22 Popular Tourist Spots Including Sinhagad, Rajgad, Tamhini Ghat

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now