Pune Temperature | मार्च महिना आता कुठे सुरू झाला आहे. उन्हाळ्याची सुरूवात होताच पुणे शहरामध्ये अंगाची लाही लाही होताना दिसते. यामुळे पुणेकर (Pune Temperature) वाढत्या तापमानामुळे होरपळून गेले आहेत. पुणे शहरात (Pune Temperature) आतापर्यंत पारा 30 ते 37 अंशापर्यंत होता. मात्र आता तो पारा वाढला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे
पुणे शहर तापमानाने (Pune Temperature) घामाघूम झालं आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरामध्ये 37 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं आहे. पुण्यातील (Pune Temperature) लवळे येथे सर्वाधिक 40.1 सेल्सिअस तापमान आहे.
पुणे शहरातील तापमान
शिवाजीनगरमध्ये 37.3 तापमान, लोहगाव आणि मगरपट्ट्यात 37.8, चिंचवडमध्ये 38.5 तर पाषाणमध्ये 37.2 तापमान झालं आहे. हवामान खात्याने पुणे शहरामध्ये पुढील काही दिवस तापमान हेच असणार आहे, असा अंदाज वर्तवला आहे.
लवळेमध्ये कमाल तापमान हे सर्वाधिक असताना किमान तापमान हे 24.1 आहे. त्यानंतर मगरपट्टामध्ये 22. 4, चिंचवडमध्ये 21.8, कोरेगाव पार्क 21.4, बालेवाडीत 19.4, वडगाव शेरी 18, पाषाणमध्ये 17.8, लवासा 17.2, शिवाजीनगर 16.5, हवेलीमध्ये 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद आहे.
पुणे ग्रामीण भागात तिच परिस्थिती
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही तापमानाचा पारा वाढला आहे. भोर, आंबेगाव, पुरंदर, नारायणगाव, शिरूर अशा इतरही पुणे ग्रामीण भागामध्ये तापमानाचा पारा वाढला आहे.
भोर 20.2, आंबेगाव 19.9, पुरंदर 21, नारायणगाव 16.5, शिरूर 15.3, लोणावळ्यामध्ये 18.1, इंदापूरमध्ये 19.2, खेड 21.0 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान आहे. पुणे शहराप्रमाणे पुणे ग्रामीण भागात तापमानात वाढ झाली आहे.
News Title – Pune Temperature News Update
महत्त्वाच्या बातम्या
मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!
‘या’ गोष्टींसाठी पतीला कधीच नाही म्हणू नका, अन्यथा…
बारामतीच्या आखाड्यात बच्चू कडूंची एन्ट्री, अजित पवार-सुप्रिया सुळेंना धक्का!
“देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती हरणार”, महायुतीच्याच नेत्याचं भाकीत
मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदललं






