पुण्यात ‘त्या’ रात्री पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

On: August 2, 2025 9:39 AM
Pune Police Attack
---Advertisement---

Pune Police Attack | पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना घडली. खडकी परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिस यंत्रणेला मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

ही घटना ३१ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील चर्च चौक, खडकी येथे घडली. पोलिसांनी एका वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या वाहनचालकाला थांबवून विचारणा केली, यावरून संतप्त झालेल्या चौघांनी पोलिसांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी पोलिसांना जमिनीवर पाडून जबर मारहाण केली. (Pune Police Attack News)

गाडी थांबवल्याचा राग; पोलिसांना मारहाण :

या घटनेत गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, ते मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. गाडीच्या वेगाबाबत विचारणा करताच आरोपींची प्रतिक्रिया अत्यंत हिंसक होती. सरळसरळ सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणं हे गंभीर गुन्हा असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास अजून मोठा ताण निर्माण होऊ शकतो.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जुनेद इक्बाल शेख (27), नफीज नौशाद शेख (25), युनूस युसुफ शेख (25), आरिफ अक्रम शेख (25) यांचा समावेश आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Police Attack | सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढतेय? :

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपींना न्यायालयात हजर केलं आहे. न्यायालयीन कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांवर हल्ला करणे हे अत्यंत गंभीर प्रकरण असून, अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी होत आहे. (Pune Police Attack News)

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्यांना गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र, पुण्यासारख्या शहरात चक्क पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावरच हल्ला होणं ही चिंतेची बाब आहे.

News Title: Pune Shocker: Four Youths Assault On-Duty Police Officers in Khadki, All Arrested

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now