पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

On: March 4, 2024 10:49 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असतानाचंं चित्र पहायला मिळत आहे. कोयता गँगची दहशत त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठे गुन्हे घडत आहेत. दरम्यान पुण्यात महिलांवर होत असलेल्या आत्याचाराच्या देखील बातम्या होत आहेत. मात्र पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील (Pune News) वाकड परिसरातील एक घटनेनी शहरात एकच चर्चा चालू आहे. सोशल मीडियावरुन पुण्यातील एक तरुण आणि तरुणीची ओळख झाली. इंस्टाग्रामवरुन दोघेजण एकमेकांच्या संपर्कात आले होते. या वेळी मुख्य आरोपी शुभम राठोड यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटचं नाव ‘पीएसआय शुभम राठोड’ असं ठेवत दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरूत तरुणीला बोलायचा.

दरम्यान, इंस्टाग्राम वरुन झालेल्या ओळखीचं रुपतांर मैत्रीत झालं आणि त्यानंतर दोघेजण व्हाटअॅपवर चॅटिंग करु लागले. मात्र, शुभमने या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिल्याने तुझे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली.

शरीरसुखाची मागणी केली-

सोशल मीडियावर बोलत असताना शुभमने (Pune News) तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. तुझ्यासोबत लग्न करणार असून तिच्याकडून फोटो मागूण घेतले. त्यानंतर ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली. शुभमने तरुणीकडे आठ हजार रुपयांची मागणी केली.

याबरोबरच त्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करुन तिच्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने अधिक पैशांचीदेखील मागणी केली. त्यामुळे शुभम याने वारंवार फोनवरून, लग्नाची, शारीरिक सुखाची व पैशांची मागणी केली. ही बाब अति होत असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं आणि तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली.

सोशल मीडियामुळे वाढते गुन्हेगारी?

महत्त्वाच्या बातम्या- 

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now