Pune News | पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध असतानाच्या खाजगी क्षणांचे व्हिडीओ तरुणीच्या नकळत चित्रीत करून, लग्नाला नकार दिल्याच्या रागातून ती व्हिडीओ क्लिप पोर्न साईटवर टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्याचा गैरवापर; खाजगी क्षणांचं विकृत भांडवल-
24 वर्षीय पीडित तरुणी एका कंपनीत मॅनेजर (Pune News) म्हणून कार्यरत असून, आरोपी विनय शिरीष कुलकर्णी (Viney Shirish Kulkarni, 27, फुलेवाडी, कोल्हापूर) हा अॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यात मैत्री झाली आणि ती प्रेमात बदलली. परस्पर संमतीने संबंध झाले असताना, विनयने तिच्या नकळत नग्न अवस्थेतील व्हिडीओ चित्रीत केले.
काही कारणांमुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं आणि पीडित तरुणीने विनयला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर काही महिन्यांनी तिच्या मैत्रिणीने पोर्न साईटवर पीडितेचा व्हिडीओ पाहून तिला याबाबत माहिती दिली. यानंतर पीडितेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर गुन्ह्याचा वाढता धोका-
हा प्रकार ३० डिसेंबर २०२३ ते १२ मे २०२५ या कालावधीत घडला (Pune News) असल्याची माहिती आहे. पोलिसांनी विनय कुलकर्णी याच्यावर आयटी अॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे (Sunita Rokade) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ही घटना केवळ सायबर गुन्ह्याचं उदाहरण नाही, तर नात्याच्या नावाखाली झालेला विश्वासघात देखील आहे. पोलिसांकडून आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता असून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.






