पुण्यात चाललंय काय?, मध्यरात्री घडलेल्या प्रकाराने नागरिक हादरले

On: January 29, 2025 12:31 PM
Pune News Vehicles Vandalized Again 40 Vehicles Damaged
---Advertisement---

Pune News | पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे (Law and Order) तीनतेरा वाजल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, अशातच मंगळवारी रात्री दत्तवाडी (Dattawadi), लक्ष्मीनगर (Laxminagar), पर्वती (Parvati) परिसरात तब्बल 40 गाड्यांची तोडफोड (Vandalism) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये (Puneties) भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणा (Police System) हातावर हात ठेवून बसली आहे का?, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (Pune News)

एकीकडे खून (Murder), कोयता गँगच्या (Koyta Gang) दहशतीचे प्रमाण वाढले असताना, आता गाड्यांच्या तोडफोडीची प्रकरणे उजेडात येत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

40 गाड्यांचे नुकसान, नागरिकांमध्ये भीती

मंगळवारी रात्री समाजकंटकांनी (Antisocial Elements) धुडगूस घालत तब्बल 40 गाड्या फोडल्या. यामध्ये चारचाकी (Four Wheelers) आणि रिक्षांचा (Rickshaws) समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बुधवारी सकाळी देखील सात ते आठ वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पर्वती पोलीस स्टेशनच्या (Parvati Police Station) हद्दीत हा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. (Pune News)

कोयता गँगची दहशत कायम

मागील आठवड्यात बी. टी. कवडे रोड (B. T. Kawade Road) परिसरात कोयता गँगने दहशत माजवण्यासाठी तब्बल 50 वाहनांची तोडफोड केली होती. तर, मंगळवारी येरवडा (Yerwada) परिसरातही गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. या घटनांमधून कोयता गँगची दहशत अद्यापही कायम असल्याचे दिसून येते.

पुण्यातील या वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (Pune News)

Title: Pune News Vehicles Vandalized Again 40 Vehicles Damaged

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now