शिवसेना नेते वसंत मोरे स्वारगेट बस स्थानकात घुसले आणि… जोरदार राडा

On: February 26, 2025 6:55 PM
Vasant More
---Advertisement---

Pune News | स्वारगेट (Swargate) बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मोठा गदारोळ उडाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) आणि त्यांच्या समर्थकांनी स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा रक्षक कार्यालयात घुसून तेथे तोडफोड केली.

बसस्थानकातील अस्वच्छता आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मंगळवारी पहाटे २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला. या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी बसस्थानकाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बसस्थानकात धडक मारली.

या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर कपडे, दारूच्या बाटल्या, कंडोम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. बसस्थानकात बंद असलेल्या बसमध्येही दारूच्या बाटल्या सापडल्या. याबाबत विचारणा केली असता, प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वसंत मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी सुरक्षा रक्षक कार्यालयाची काच फोडली.

पोलीस गप्प का? सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर आरोप

या घटनेच्या काही वेळ आधी अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बसस्थानक परिसरात उपस्थित होते. मात्र, वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. हा प्रकार प्रसारमाध्यमांद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचला, तेव्हा मात्र पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वसंत मोरे यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, आरोपी गेल्या पाच दिवसांपासून याच परिसरात झोपत होता, तरीही त्याला कोणीही अडवले नाही. येथे रोज अशा अनैतिक घटना घडत असतात, त्याची जबाबदारी कोणी घेणार? सुरक्षा रक्षक आणि बस आगार प्रमुखाला तत्काळ निलंबित केले पाहिजे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

English Title: Pune News Vasant More Attacks Security Lapses at Swargate

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now