Pune News | पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद… मनस्ताप टाळायचा असेल तर आत्ताच वाचा

On: December 31, 2023 4:18 PM
pune news
---Advertisement---

Pune News | सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांची मोठी लगबग होताना पहायला मिळत आहे. ३१ डिसेंबरची रात्र ही अनेकांसाठी आनंद साजरा करणारी रात्र असते, रात्री ७-८ वाजल्यापासून लोक महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी करतात तसेच बरोबर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नवीन वर्षाचं स्वागत करतात. यंदा देखील अशाच प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत आणि सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकजण वाट पाहात आहे.

पुण्यात (Pune News) देखील अशा महत्त्वाच्या दिवशी लोक दोन तीन ठिकाणी मोठी गर्दी करतात. ती महत्त्वाची ठिकाणं म्हणजे डेक्कन भागातील एफसी रोड (FC Road, Pune) तसेच याच भागातील जंगली महाराज रोड(JM Road, Pune)… याशिवाय पुण्याच्या कॅम्प भागातील एमजी रोडवर(MG Road, Pune) सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पहायला मिळतात. यंदा देखील नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील या तिन्ही रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुणे पोलिसांनी या भागातील वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहेत.

पुण्यातील वाहतुकीत कोणते बदल?

पुण्यातील वाहतुकीत आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून बदल करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी (Pune Traffic Police) घेतला आहे. यामध्ये पुण्यातील एमजी रोड, एफसी रोड, जेएम रोड हे रस्ते सायंकाळी ५ वाजल्यानंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. (कुठून कुठपर्यंत बंद असणार मार्ग हे खाली दिलं आहे.)

पुण्यातील या तिन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवर थर्डी फर्स्टच्या निमित्ताने दरवर्षी मोठी गर्दी पहायला मिळते. लोक मित्र मैत्रिणी तसेच आपल्या नातेवाईकांसोबत येथे मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे नागरिकांना कुठलाही मनस्ताप होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.

कुठून कुठपर्यंत बंद असणार मार्ग-

एमजी रोडवर- महात्मा गांधी रस्त्यावरील 15 ऑगस्ट चौकापासून ते अरोरा टावर्स चौकापर्यंत वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. (Pune News) एफसी रोडवर- फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले स्मारक चौक (Hotel Goodluck Chowk) ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना नो एंट्री असणार आहे

जेएम रोडवर- जंगली महाराज रस्त्यावर सुद्धा यंदा वाहनांना बंदी असणार आहे. या (Pune News) भागात होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून (Zanshi Rani Chowk) वाहतूक बंद असणार आहे.

News Title: pune news traffic changes on fc road jm road mg road

महत्त्वाच्या बातम्या-

Asha Negi | ‘निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

1 जानेवारीपासून होणार ‘हे’ बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Malaika Arora | मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या नात्यात मिठाचा खडा, समोर आली धक्कादायक बातमी

Viral News | पप्पी घेतली, पदर खेचला, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबतचे मुख्याध्यापिकेचे नको ते चाळे व्हायरल

Maharashtra | महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!

 

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now