Pune News | पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे भागात असलेल्या एका फटाक्याच्या गोदामाला आग लागली आहे. या आगीत अनेक कामगार जखमी झाले असून, काही कामगार अद्यापही बेपत्ता आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
तळवडे परिसरात (Pune News) दुपारच्या सुमारास एका गोदामाला आग लागली. माध्यमांकडून समोर अलेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केलं.
आग इतकी भयानक होती की, गोदामातील कर्मचाऱ्यांना बाहेर देखील पडता आलं नाही. अनेक कामगार आगीत होरपळले. अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरीकही सैरभैर झाले आहेत. हे काय घडलं आणि कसं घडलं? याची एकच चर्चा रंगली होती.
हा प्रकार समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी (Pune News) धाव घेऊन आग विझवली. जखमी आणि मृत महिलांना बाहेर काढलं. स्पार्कल कॅण्डल बनविण्याच्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याने जागेवरच 6 महिलांचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की मृतांची ओळख पटवणे देखील मुश्किल झाले आहे.
या घटनेमुळे फटाके गोदामांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. फटाके गोदामांना योग्य परवानगी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, हे यानिमित्ताने समोर आले आहे.
Pune News: दोषींवर कारवाईची मागणी
थोडक्यात बातम्या-
Google Alert | गूगलने 17 Apps हटवले, तुमच्या फोनमध्ये असतील तर आत्ताच काढून टाका
Hamza Saleem Dar | आरारारा खतरनाक!, 6 चेंडूत 6 षटकार आणि एका ओव्हरमध्ये 43 धावा
Jio | जिओच्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!
Fighter Teaser | ऋतिक आणि दीपिकाचा हॉट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या Team India चं टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी!






