पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत केलं भयंकर कृत्य, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

On: April 12, 2024 6:09 PM
Ahmednagar
---Advertisement---

Pune News | पुणे विद्येचं माहेर घर म्हणून जगभरात ओळखलं जात आहे. विद्येच्या माहेर घरात विद्यार्थ्यांला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान काही वर्गात शिक्षक नसल्याने सर्व विद्यार्थी एकत्रीत घोळका करुन बसले होते. शिक्षक वर्गात येताच आणि विद्यार्थ्याला अक्षरशः लाथाबुक्याने मारतात. घडलेला हा प्रकार विद्यार्थ्याने सांगितला नाही. परंतु सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला.

नेमका प्रकार काय?

पुण्यातील (Pune News) एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली. दरम्यान, हा प्रकार मागील महिन्यात घडला होता. परंतु त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वर्गात दंगा करत असल्याचं पाहून शिक्षिकेने ही मारहाण केली.

दरम्यान, या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या पालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझा मुलगा शिकत असलेल्या शाळेतील एक शिक्षक रजेवर होते. त्या शिक्षकांच्या जागी पूजा केदारी या शिक्षिका वर्गात आल्या. त्यावेळी काही मुले घोळका (Pune News) करुन बसले होते. शिक्षक आल्यावर सर्व मुले जागेवर जाऊन बसले.

पुढे काय घडलं?

गैरहजर असलेल्या शिक्षिकेच्या जागेवर केदारी वर्गावर आल्या. मात्र, त्या रागात होत्या आणि यावेळी विद्यार्थी गोंधळ करत असताना त्यांना राग अनावर न झाल्याने त्यांनी वर्गातल्या मुलाला लाथाबुकक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

मागील महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यावेळी मुलाने हा प्रकार सांगितला नाही. परंतु मुलास मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो माझ्या पाहण्यात आला. त्यानंतर मुलाकडे विचारणा केली असता त्याने सविस्तर प्रकार सांगितला, असं पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडीओ-

News Title : pune news student get kicked by teacher

महत्त्वाच्या बातम्या-

जळगावात भाजप उमेदवार बदलणार?, उमेदवारीसाठी ‘या’ नेत्यानं गाठली दिल्ली

दुसऱ्यांदा लग्न करुनही मन भरे ना; अभिनेता अरबाज खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?

‘केजीएफ’ स्टार यशने तब्बल इतक्या कोटींची ऑफर धुडकावली?,’या’ भूमिकेसाठी दिला नकार

जसप्रीत बुमराहचा जलवा, केला ‘हा’ मोठा पराक्रम

सर्वसामान्यांना दणका!, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रिचार्ज महागणार

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now