पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!

On: April 3, 2024 11:41 AM
Waqf Amendment Bill
---Advertisement---

Pune News | पुणे (Pune News) हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र त्याच पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. पुणे शहराची राज्यातच नाहीतर देशात सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. मात्र पुणे शहरामध्ये (Pune News) सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील वातावरण हे भयभीत झालं आहे. यामुळे अनेकदा पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होताना दिसतोय.

गुन्हेगारांचे 18 हॉटस्पॉट निश्चित

अनेक दिवसांपासून पुणे शहरामध्ये (Pune News) घरफोडी होताना दिसते. वाहने चोरली जातात. यामध्ये जवळपास अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यामुळे आता पुणे शहरातील (Pune News) कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलिसांनी लक्ष घालायला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी गुन्हेगारांचे 18 हॉटस्पॉट निश्चित केले. त्यापैकी प्रत्येक एका ठिकाणी स्थानिक पोलीस कोम्बिंग ऑपरेशन रबवतील, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडलीच काढली

वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटना आणि गुन्हेगारीचे वास्तव्य याचा अभ्यास करण्यात आला आहे. बेकादेशीर शस्त्र बाळगणे, चोऱ्या करणे, अल्पवयीन गुन्हेगारांकडून वाहन चोरी, वाहनांची तोडफोट सोनसाखळी हिसकावणे असे अनेक गुन्हे होऊ लागले आहेत. यांची पोलिसांनी कुंडलीच काढली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

सराईत गुन्हेगारांसह, भुरट्या चोरांवर खासकरून नजर असणार आहे. पुण्यातील चोरांच्या, गुन्हेगारांच्या 18 हॉटस्पॉट असलेल्या एक-एक ठिकाणी पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार आहेत. एकत्रित कॉम्बिंग घेतली जाऊन झाडाझडती घेतली जाईल. दरम्यान बहुतेक गुन्हेगार हे स्थानिक असल्याचं समजतंय.

News Title – Pune News Pune Crime News Update

महत्त्वाच्या बातम्या

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई

पुण्यातील ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर!

Join WhatsApp Group

Join Now