महिला सुरक्षेसाठी पीएमपीएलचा मोठा निर्णय, आता थेट…

On: March 5, 2025 7:30 AM
Pune Traffic Diversion
---Advertisement---

Pune News | पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास, बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात बस घेऊन जाऊन तक्रार दाखल करावी, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. (Pune News )

स्वारगेट घटनेनंतर तातडीने निर्णय

स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासन सतर्क झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. बसस्थानकांवर आणि आगारांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

महिला सुरक्षेसाठी पीएमपीच्या स्पष्ट सूचना:

  1. महिला प्रवाशांना त्रास दिल्यास बस थेट पोलिस ठाण्यात न्यावी आणि तक्रार दाखल करावी.
  2. बसमधील कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तातडीने पीएमपी अपघात विभाग आणि पोलिस नियंत्रण कक्षाला द्यावी.
  3. सर्व आगार व्यवस्थापकांनी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि बंद असलेले कॅमेरे त्वरित दुरुस्त करावेत.
  4. स्वमालकीच्या तसेच ठेकेदारांच्या बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का, याची पाहणी करावी.
  5. रात्री पार्किंग करताना बसचे हँड ब्रेक लावले गेले आहेत का, दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत का, याची खात्री करावी.
  6. गॅरेज सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकांनी वेळोवेळी पार्क केलेल्या बसची पाहणी करावी. (Pune News )

बसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

अनेकदा महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागांवर टवाळखोर बसतात आणि त्यांना उठवताना वाद घालतात. महिला वाहक किंवा प्रवाशांनी विरोध केला तर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पीएमपीचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Title : Pune News PMPML Takes Strong Steps for Womens Safety  

 

Join WhatsApp Group

Join Now