मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर अन् वसंत मोरे दिसले एकत्र, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

On: March 27, 2024 6:13 PM
Pune Loksabha Election
---Advertisement---

Pune News | पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वसंत मोरे (Vasant More) यांनी हजेरी लावली. तिघांनी एकत्र बसून पुण्यातील विविध विषयांवर गप्पा मारल्या. तिघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मोहोळ, धंगेकर अन् मोरे आले एकत्र

पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. महायुतीकडून मुरलीधर महोळ उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांमध्ये लढत होणार आहे. त्यात वसंत मोरेदेखील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यापूर्वीच पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर तीघेही एकत्र आले.

एरवी एकमेकांवर ताशेरे ओढणारे मोहोळ आणि धंगेकर यांच्यात एकत्र बसून पुण्यातील विविध विषयांवर गप्पा रंगल्या. येत्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार कट्ट्यावर एकत्र पाहायला मिळाले.

वसंत मोरे पुण्यातले तिसरे उमेदवार असतील अशा चर्चा रंगल्या असतानाच ते वाडेश्वर कट्ट्यावर आले होते. त्यांनीदेखील राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा केली.

वाहतूक कोंडी, प्रदुषण, पाण्याच्या समस्या अशा अनेक समस्या सध्या पुणेकरांना आहेत. याच समस्यांवर काम करणार आणि निवडणुकीत हेच मुद्दे घेऊन उतरणार असल्याचं मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे.

आमच्या आधी असलेल्या सगळ्यांनी कामं केली पण मला पुण्यात 50, 100 वर्षांचं भविष्य घडवायचं आहे, मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. मी पुण्याच्या कानाकोपऱ्यात  पोहोचलोय पण मला पुण्याला सर्वोच्च स्थरावर घेऊन जायचं आहे, असंही मोहोळ म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-  

सुनेत्रा पवारांची अजित पवारांसाठी खास पोस्ट, म्हणाल्या…

सिनेमात काम करणार?; अमित ठाकरेंनी अखेर सांगूनच टाकलं

“जनतेच्या मनातील मोदी कसे पुसणार?”, रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंना टोला

महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘हे’ बडे नेते करणार प्रचार

पत्नीला सेकंड हँड म्हणणं पतीला पडलं महागात, भरावा लागला इतका दंड

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now