“मुघल, फ्रेंच, रशियन इतिहास काढा, शिवराय, महाराणा प्रतापांचा समावेश करा”, विद्यार्थ्याने जीवन संपवलं

On: May 14, 2025 1:52 PM
MBBS Student
---Advertisement---

Pune News | मूळच्या बीड (Beed) येथील आणि भोपाळमध्ये (Bhopal) वैद्यकीय (MBBS Student) शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यात (Pune) आपले आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. त्याने आई-वडिलांना व्हॉट्सॲपवर (WhatsApp) अखेरचा संदेश पाठवून आणि स्वतःच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे शैक्षणिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अभ्यासाचा तणाव आणि टोकाचे पाऊल-

उत्कर्ष महादेव शिंगणे (Utkarsh Mahadev Shingne) (वय १९ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो भोपाळ (Bhopal) येथील प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) (All India Institute of Medical Sciences (AIIMS)) येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. अभ्यासाच्या तीव्र तणावाला कंटाळून त्याने १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यात (Pune) चाकूने स्वतःला भोसकून घेत जीवनयात्रा संपवली. तो काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे आणि त्यासाठी उपचार घेत असल्याचे समजते.

उत्कर्ष ८ मे रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (MBBS Student) वतीने पुण्यातील एएफएमसी (AFMC) मैदानावर आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होता. स्पर्धेसाठी आलेल्या उत्कर्षने त्याच्या राहत्या खोलीतील बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचे उघड झाले. वानवडी पोलीस (Wanawadi Police) ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आत्महत्येपूर्वीची मनस्थिती आणि अखेरचा संदेश-

धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवातील डीजे नाईटमध्ये मित्रांसोबत मनसोक्त आनंद लुटला होता. इतकेच नव्हे तर, त्याने दुसऱ्या दिवशी भोपाळला परत जाण्यासाठी मित्रांना तिकीट बुक करण्यासही सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पहाटे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस तपासात त्याने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाइन मागवला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सॲपवर एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले आहे की, “मी उत्कर्ष शिंगणे, एम्स (AIIMS) भोपाळचा विद्यार्थी, शैक्षणिक तणाव आणि नैराश्यामुळे माझे जीवन संपवत आहे.” या संदेशात त्याने शिक्षणमंत्र्यांना एक विशेष विनंतीही केली आहे. अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच आणि रशियन इतिहास काढून टाकून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे प्रेरणादायी चरित्र समाविष्ट करावे, असे त्याने आपल्या अखेरच्या पत्रात नमूद केले आहे.

News Title – Pune news MBBS Student caught dead in room

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now