Pune News | पुणे हादरलं, मराठी अभिनेत्रीवर मुळशीत बलात्कार!

On: January 28, 2024 6:01 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोयता गँगची दहशत त्यानंतर छोट्या गोष्टींमुळे मोठे गुन्हे घडत आहेत. दरम्यान पुण्यात महिलांवर होत असलेल्या आत्याचाराचं प्रमाण देखील वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे. पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाचं अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

अभिनेत्री आणि आरोपी यांची (Pune News) सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर याचं मैत्रीत रूपांतर झालं. माझ्या पत्नीला घटस्फोट सुद्धा देईल असं आरोपीने अभिनेत्रीला सांगितलं होतं. विराज पाटील असं आरोपीचं नाव असून त्यांने अभिनेत्रीला तुझ्यासोबत लग्न करेल असं अमिष दाखवलं.

दरम्यान, अभिनेत्रीने विराजची पोलिसात तक्रार दिली आहे. सोशल मीडियावर या दोघांची ओळख झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. विराजने पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेन असं म्हणत अभिनेत्रीवर पुण्यातल्या (Pune News) मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये वेळोवेळी बलात्कार केला. लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असं अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलं आहे.

अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

27 ऑगस्ट 2023 पासून 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर आणि मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये सातत्याने बलात्कार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर पीडिताने फोन केल्यानंतर आरोपीने ते फोनसुद्धा उचलणं बंद केलं होतं.

माझ्या घरच्यांना का टाळत आहेस? फोन का उचलत नाही, असा प्रश्न विराजला महिलेनं विचारल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसंच त्याच्याकडे असलेलं पिस्तूल तरुणीच्या डोक्यावर ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तू जर पोलिसांकडे गेली तर तुला मी दाखवतो कोण आहे, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी विराज पाटीलबाबत माहिती काढली. मिळाल्या माहितीनूसार विराज पाटील, हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून पीडित महिला अभिनेत्री आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीचा फायदा विराज पाटील घेत होता. त्यातूनच त्यांची पुढे ओळख वाढत गेली आणि पुढे हा सगळा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही.

News Title : Pune News Marathi Actress Got Rapped In Mulshi

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | ‘मनोज जरांगेंची औकात नाही, त्यांची लायकी नाही’; ‘या’ नेत्याचं जरांगेंना आव्हान

जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ketaki Chitale | केतकी चितळे पुन्हा वादात; नेटकरी भडकले, ‘मराठा जातीबद्दल किती द्वेष’

Bihar Politics | ‘…म्हणून मी राजीनामा दिला’; नितीश कुमारांनी सांगितलं खरं कारण

LIC Pension Scheme | ‘…तर महिन्याला मिळेल 20 हजार रुपये पेन्शन’; LIC ची भन्नाट योजना

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now