Pune News | मेट्रोने पुणेकरांचा (Pune News) प्रवास सोपा तर झाला आहे, मात्र आता प्रवास खर्चापेक्षा पार्किंगचाच खर्च जास्त झाला आहे. पुण्यात सध्या फक्त 8 मेट्रो स्थानकांवर पार्किंगची सुविधा आहे. आता त्याच ठिकाणी सशुल्क पार्किंगची सुविधा महामेट्रोने सुरू केली आहे.
अगोदर जिथे मोफत सुविधा मिळत होती तिथे आता प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे मेट्रोची एकूण 20 स्थानके सध्या सुरू आहेत. आता येथील पार्किंगवर दुचाकीसाठी 15 रुपयांपासून पुढे शुल्क आकारले जाणार आहे.
प्रवाशांना पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे
पुण्यात (Pune News) पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, मंगळवार पेठ आणि आयडियल कॉलनी या आठ स्थानकांवर पार्किंगची सुविधा पुर्वी प्रवाशांसाठी मोफत होती. आता महामेट्रोने या ठिकाणी कंत्राटदाराची नियुक्ती करून ही सेवा सशुल्क केली आहे.
त्यामुळे प्रवाशांना आता पार्किंगसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या कार्यान्वित मार्गावर महामेट्रोचे कमाल तिकीट दर 35 रुपये आहे. मात्र, या मार्गाने प्रवास करणाऱ्या एखाद्या दुचाकीस्वाराला दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागणार असेल, तर त्याला तिकिटाच्या दराएवढेच शुल्क पार्किंगसाठी द्यावे लागणार आहे.
पार्किंगसाठी ‘इतके’ पैसे भरा
यामध्ये दुचाकी, चारचाकी , सायकल तसेच बस यांना किती वेळ लागणार आहे, त्या हिशोबाने पैसे भरावे लागणार आहेत. त्यानुसार दर (रुपयांत) खाली दिले आहेत.
दोन तासांपर्यंत –2- 15 – 35 – 50
दोन ते सहा तासांपर्यंत – 5– 30 – 500 – 70
सहा तासांपेक्षा जास्त – 10 – 60 – 80 – 100
दरम्यान, मेट्रोतून प्रवास केलेले तिकीट असल्यास प्रवाशांना पार्किंगच्या शुल्कात 25 टक्के सवलत मिळेल. प्रवाशांसाठी वाहनतळाची मासिक पास सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच दुचाकी स्वारांना हेल्मेट ठेवण्यासाठीही सुविधा दिली जाईल.
News Title : Pune News maha metro paid parking at eight stations
महत्त्वाच्या बातम्या –
गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
‘या’ 3 राशींवर आज लक्ष्मी होईल प्रसन्न!
“अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत






