पिंपरीतील ‘हा’ रस्ता बनतोय ब्लॅक स्पॉट; महिन्याभरात 5 मोठे अपघात तर दोघांचा मृत्यू

On: January 26, 2025 9:36 AM
Pune News Indurance Chowk to Jamdar Vasti Road Turns Death Trap
---Advertisement---

Pune News | जामदार वस्ती ते इंड्युरन्स कंपनी चौक दरम्यानचा रस्ता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मागील काही दिवसात पाच भीषण अपघात झाले असून, या अपघातांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चिंताजनक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune News )

अपूर्ण रस्त्यामुळे वाढतोय धोका

सदर रस्त्यावर काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण काँक्रिटीकरणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली आहे. या खडीवरून घसरून वाहने अपघातग्रस्त होत असल्याचे समोर आले आहे.

भरधाव वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ

या रस्त्यावरून वाहने अतिशय वेगाने धावत असल्याचे दिसून येते. अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहने चालवतात. वेगमर्यादेचे पालन न करणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यांमुळे अपघातांच्या संख्येत भर पडत आहे. (Pune News )

प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत?

या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून, तसेच या रस्त्यावर वेगमर्यादा निश्चित करून, तिचे काटेकोरपणे पालन होईल याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Title : Pune News Indurance Chowk to Jamdar Vasti Road Turns Death Trap

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now