“मला लग्न करायचं नाही”, लग्नाच्या दिवशीच तरूणाने उचललं मोठं पाऊल

On: April 17, 2024 1:37 PM
Pune News groom ended life on marriage day
---Advertisement---

Pune News | घरात लग्नाची धामधूम, सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना अचानक नवरदेवाने आत्महत्या केल्याची घटना घडल्यावर सर्वत्र मशान शांतता पसरली. ही दुःखद घटना पुण्यात घडली आहे. घरात नातेवाईक, पाहुणे मंडळींची लगबग सुरू असताना नरदेवाने पहाटे विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. यामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे.

‘मला लग्न करायचं नाही’, असा मेसेज पाठवून नवरदेवाने आपलं जीवन संपवलं. यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सूरज रायकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो तळेगाव दाभाडे इथं राहत होता. मंगळवारी त्याचं लग्न होतं. लग्नाची धामधूम घरात सुरू होती.

लग्नाच्या दिवशीच तरुणाने जीवन संपवलं

त्याने सकाळीच आपल्या मामाला फोन लावला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. त्याने मला लग्न करायचं नाही असा मेसेजही मामाला पाठवला होता. बराच वेळ तो न परतल्याने कुटुंबियांनी शोध घेतला. त्याची दुचाकी आणि मोबाईल विहिरीजवळ आढळून आल्याने घरच्यांच्या पायाखालची जमीनच (Pune News) सरकली.

लग्नाच्या दिवशीच सूरजने असा निर्णय का घेतला याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आली नाहीये. सोमवारी रात्री त्याने आपल्या लग्नाचे आमंत्रण फोनवरून आपल्या जवळच्या मित्रांना दिलं होतं. असं असताना त्याने इतका मोठा निर्णय का घेतला असावा?, असा प्रश्न आता केला जात आहे.

28 वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

देहूगाव येथे सरस्वती मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी लग्न असल्याचा त्याने मेसेज आणि फोनवरून सांगितलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सुरजचा मृतदेह आढळून (Pune News) आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

आई-वडिलांचा एकुलता एक असलेल्या सूरजच्या अशा निधनाने कुटुंबियांना धक्का बसला आहे. यामुळे लग्नाऐवजी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची वेळ नातेवाईकांवर आली. सुरजच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. तो असं करूच शकत नाही, अशा भावना त्याच्या मित्रांकडून व्यक्त करण्यात आल्या.

News Title – Pune News groom ended life on marriage day

महत्त्वाच्या बातम्या –

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू

Join WhatsApp Group

Join Now