Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ

On: December 17, 2023 8:28 PM
pune news
---Advertisement---

Pune News | पुण्यात कायम मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. अनेकवेळा संगीत महोत्सव किंवा नाटकं पुण्यातील नाट्यगृहात पार पडत असतात. दरम्यान, पुण्यातून एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका महोत्सवादरम्यान आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवादरम्यान आगीची घटना घडली आहे. सवाई गंधर्व (pune news) कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. आग छोट्या स्वरुपाची असल्याने कुठलंही फार मोठं नुकसान झालेलं नाही.

नेमकी कशामुळे लागली आग?

रंगमंचाच्या मागे असणाऱ्या एका खोलीत शॉर्टसर्कीट झाल्याचं समोर आलं आहे, यामुळेच पुढे आग लागल्याची घटना घडली. मात्र, मिळालेल्या माहितीनूसार ही आग लागल्याचं लवकर लक्षात आलं. त्यामुळे फार मोठं नुकसान झालं नाही

आगीवर लगेच नियंत्रण मिळवले-

आग लागल्याचं लगेच लक्षात आल्याने अवघ्या 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आयोजकांना यश आलं, पण अचानक आग लागल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी धावपळ उडाली होती. 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत सुरु असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

News Title : pune news fire breaks out at savai gandharva program

थोडक्यात बातम्या-

Aishwarya Rai | ती आता लहान राहिलेली नाही!, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट कुणासाठी???

Entertainment News: मुलगा झाला की मुलगी???, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी

INDvsSA | भारताच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ थांबेना! शमी-चहरनंतर आता ‘हा’ बडा खेळाडू मालिकेतून बाहेर

India vs South Africa | पार वाट लावून टाकली!, ‘या’ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेची हालत केली खराब

Bollywood News | पतीनेच केला कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now