पुणे हादरलं! नग्न व्हिडीओ काढत अल्पवयीन मुलीसोबत केलं भयानक कृत्य

On: April 13, 2024 8:16 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. पुण्यात महिलांवर होत असलेल्या आत्याचाराचं प्रमाण देखील वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील महिला आणि तरुणी असुरक्षीत असल्याचं म्हटलं जात आहे. महिला तरुणी यांच्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे तरुणींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. अशात पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे. अल्पवयीन मुलीचा नग्न व्हिडीओ शूट करत तिला ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे अजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनूसार आरोपी कपिल वाल्हेकर हा 18 वर्षांचा असून याचे फिर्यादीत मुलीसोबत प्रेम संबध होते. मात्र, प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने या अल्पवयीन मुलीसोबत (Pune News) भयंकर कृत्य केलं. मुलगी बाथरुममध्ये गेली असताना आरोपीने काच तोडून तिचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर रेकॅार्ड केलेला व्हिडीओ तिला दाखवला.

पुढे काय घडलं?

आरोपीने रेकॉर्ड (Pune News) केलेला व्हिडीओ मुलीला दाखवला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिचा छळ केला. त्याच्या या छळामुळे आणि धमक्यांमुळे अल्पवयीन मुलगी खूप त्रासली होती.

अखेर तिने यातून सुटकेसाठी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने नातेवाईकांमुळे तिचा जीव वाचला.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार-

घडलेला हा प्रकार मुलीच्या घरातल्यांनी लक्षात घेत तिला वेळीच रोखलं. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

News Title : pune news boy record girls nude video

महत्त्वाच्या बातम्या-

सांगलीत काँग्रेसचं टेंशन वाढलं; विशाल पाटलांना थेट ‘या’ पक्षातून ऑफर

निसर्गप्रेमी, गिरीप्रेमींची साथ मला यशाचं शिखर गाठण्यासाठी ऊर्जा देईल- मुरलीधर मोहोळ

प्रेमानंद महाराज यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

‘…म्हणून नरेंद्र मोदींना एक संधी दिली’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, बारामतीत नेमकं काय घडलं?

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now