Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

On: December 20, 2023 8:40 PM
BJP
---Advertisement---

Pune News | पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपच्या (BJP) एका नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे भाजपच्या पुण्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्या नेत्याने केली आत्महत्या?

सुनील धुमाळ (वय ४५) असं आत्महत्या केलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. धुमाळ हे पुण्याच्या (Pune News) भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मंगळवारी सकाळी हडपसर भागातील साडेसतरानळी येथे रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

धुमाळ यांनी का केली आत्महत्या?-

सुनील धुमाळ यांनी नेमकी का आत्महत्या केली?, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही, त्यामुळे यासंदर्भात स्पष्ट कळू शकलेलं नाही. रेल्वे पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

भाजपमध्ये सक्रीय नेता-

सुनील धुमाळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केल्याने सुनील धुमाळ भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून काम करीत होते. ते भाजपमध्ये सक्रिय होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Pune News BJP Leader Suicide Update

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Ajit Pawar | जयंत पाटलांच्या वक्तव्याने सभागृहात वातावरण पेटलं, अजितदादा उठले अन्…

Lok Sabha Elections 2024 | अभिनेत्री Kangana Ranaut निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ जागांवरुन लढण्याची शक्यता

Jaya Bachchan ने कुटुंबातील ‘या’ व्यक्तीच्या कानाखाली काढला होता जाळ

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Rai कडून मोठा खुलासा!

 

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now