Pune News | अजित पवारांना होम पीचवरच धक्क्यावर धक्के, आता…

On: January 21, 2024 5:27 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच (Pune News) अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे.

अजित पवारांना होम पीचवरच धक्का

अजितदादा गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड आणि राजगुरूनगरमध्ये धक्का बसला आहे. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते पाटील यांना ठाकरेंनी शिवबंधनात बांधून घेतलं आहे.

Pune News | शैलेश मोहिते पाटील कोण?

शैलेश मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. शैलेश हे राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. तसेच राष्ट्रवादीचे ते उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपचे निरीक्षक होते. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे.

यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंना ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिलेत.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी यावेळी निवडणुकांवर भाष्य केलं आहे. आमच्यासाठी राज्यात फक्त मावळ लोकसभाच नाहीतर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत. कारण आज राज्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. राज्यातील सर्व उद्योगधंदे राज्य बाहेर पाठवले जात आहेत. आमच्या तोंडाचे घास देखील पळवला जात आहे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना म्हणाले ‘मूर्ख’; ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

Plane crashed in Afghanistan | सर्वात मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तानात कोसळलं

Ram Mandir | 22 जानेवारीला काय बंद काय चालू?; वाचा एका क्लिकवर

Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now