पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना केलं महत्त्वाचं आवाहन

On: April 10, 2024 2:23 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. 19 एप्रिलला मतदान होणार आहे. राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग लक्ष घालत आहे. सर्वांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. विविध माध्यमातून मतदारांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पुणेकरांनी (Pune News) एक अगळावेगळा प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका तयार करून सर्व मतदारांना मत देण्याचं निमंत्रण दिलं आहे.

पुणेकर (Pune News) कधी काय करतील याचा नेम नाही. पुण्याच्या पुणेरी पाट्या अनेक कारणाने चर्चेत असतात. पुण्याची भाषा पुण्याचा जीव की प्राण आहे. मात्र आता या पुण्यामध्ये (Pune News) मतदारांनी मतदान करावं यासाठी एक लग्नपत्रिका छापण्यात आली आहे. या लग्नपत्रिकेतून मतदारांना मतदान करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय. 13 मे दिवशी वय वर्षे 18 पूर्ण झालेल्या मतदारांनी मतदान करावं यासाठी निमंत्रण दिलंय. (Pune News)

लग्नपत्रिकेचा आशय

पुण्यात एक लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे. चि. मतदार आणि चि. सौ. कां. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. 13 मे रोजी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीचे निमंत्रण या पत्रिकेतून देण्यात आलंय. मतदार हा वर आहे तर लोकशाही ही वधू आहे. मतदार हा भारताचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. तर लोकशाही संविधानाची कन्या आहे. यांचा विवाह हा सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

card 2

लोकसभा 2024 च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, भारताचे स्वप्न उतरवण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठवण्यासाठी एक मतदानरूपी आशीर्वाद घेऊन हा राष्ट्रीय उत्शव साजरा व्हावा असं अगत्याचं निमंत्रण करित आहोत.

मतदान आमचा आहेर असणार आहे. विकसित भारत हेच आमचं रिटर्न भेट असणार आहे. असं त्या  पत्रिकेवर नमूद करण्यात आलंय. सध्या ही पत्रिका पुण्यामध्ये व्हायरल होऊ लागली आहे.

News Title – Pune News About Campaign For Voting Awareness Wedding Card Goes Viral

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराजचा अफलातून रेकॉर्ड; यापूर्वी धोनीने केली होती अशी कामगिरी

IPL पहायची की मालिका???, पती आणि पत्नीमधला संघर्ष पोहोचला टोकाला

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

Join WhatsApp Group

Join Now