पुणे ते नाशिक रेल्वे प्रवासात मोठा बदल होणार! जाणून घ्या नवा बदल

On: July 11, 2025 5:22 PM
Pune Railway
---Advertisement---

Pune Nashik Railway | पुणे आणि नाशिक शहरांना जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात महत्त्वाची प्रगती झाली आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून तो अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानुसार हा अहवाल तयार करण्यात आला असून, सध्या कागदोपत्री त्रुटींची छाननी सुरु आहे. (Pune Nashik Railway)

विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या मूळ मार्गावर (जुन्या प्रस्तावावर) तांत्रिक अडचणी आल्याने त्यात बदल करण्यात आला आहे. खोडद येथील GMRT टेलिस्कोप प्रकल्पामुळे जुन्या मार्गिकेवर अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे नवीन मार्गाची संकल्पना पुढे आणण्यात आली आणि ती आता प्रत्यक्षात साकारतेय.

नवीन मार्गाची वैशिष्ट्ये आणि नियोजन :

नवीन डीपीआरनुसार, पुणे ते अहिल्यानगर हा मार्ग सध्याच्या महामार्गासोबत समांतर असणार आहे. तर शिर्डी ते नाशिक या टप्प्यासाठी पूर्णपणे नवीन मार्ग आखण्यात आला आहे. एकूण २३५ किमी लांबीच्या या मार्गात पुणे ते अहिल्यानगर १२५ किमी आणि शिर्डी ते नाशिक ८२ किमी अंतर असणार आहे. या मार्गावर एकूण २४ स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत.

हा रेल्वे मार्ग प्रति तास २०० किमी वेगाने धावण्यास सक्षम असणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी सुमारे साडेतीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक शहरांमधील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

Pune Nashik Railway | विकासाला चालना देणारा प्रकल्प :

हा प्रकल्प केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर या भागातील आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही फारच महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसारख्या धार्मिक स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक ताण कमी होईल आणि स्थानिक उद्योग-व्यवसायांना बळ मिळेल. (Pune Nashik Railway)

रेल्वे मंत्रालयाकडून अहवालास हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास गती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुणे व नाशिककरांसाठी ही रेल्वे लाईन भविष्यातील एक मोठी सुविधा ठरणार आहे.

News Title: Pune-Nashik Semi High Speed Railway Project: ₹16,000 Crore DPR Finalized, Route Details Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now