पुणेकरांनो शेकोटी पेटवण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा! महापालिका आयुक्तांनी दिला थेट इशारा

On: November 20, 2025 5:23 PM
Pune Winter News
---Advertisement---

Pune Winter News | राज्यात हिवाळ्याची कडाक्याची थंडी वाढली असून पुणे शहरातही तापमानात मोठी घसरण जाणवत आहे. या गारठ्यात उब मिळवण्यासाठी नागरिकांनी शेकोटी पेटवण्याचा पर्याय मोठ्या प्रमाणात अवलंबला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, चौकात तसेच सोसायटीच्या आवारात सुरक्षा कर्मचारी थंडीपासून वाचण्यासाठी लाकूड किंवा कचरा जाळताना दिसतात. मात्र, याच शेकोट्यांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. (Pune Winter News)

या आदेशानुसार, शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा सोसायटीमध्ये शेकोटी पेटवण्यास मनाई करण्यात आली आहे. थंडी वाढली तरी कोणत्याही परिस्थितीत शेकोटी पेटवू (Pune bonfire ban) नये, असा थेट इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. थंडीचा महिना असला तरी हा आदेश लागू असल्याने नागरिक कशी प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेकोटीमुळे वाढते प्रदूषण, आरोग्यावर थेट परिणाम :

पुणे शहरातील अनेक सोसायट्या, व्यावसायिक संकुले आणि निवासी भागांमध्ये सुरक्षा रक्षक आणि कामगार थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवतात. या शेकोट्यांमध्ये लाकूड, कचरा, कोळसा किंवा जैविक पदार्थ जाळले जातात. या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे पीएम 10, पीएम 2.5 आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे हानिकारक वायू हवेत मिसळतात.

या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. दमा, अस्थमा, श्वसनाचे आजार आणि एलर्जी वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच महापालिकेने हा निर्णय सक्तीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Winter News | नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई :

हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध नियम लागू आहेत. त्यानुसारच महापालिका प्रशासनाने नवीन आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सोसायटीच्या परिसरात, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी शेकोटी पेटवताना आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्ती मग ते वॉचमन, कामगार, सफाई कर्मचारी, मनपा कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी असोत त्यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

यामध्ये कचरा, प्लास्टिक, रबर किंवा इतर हानिकारक वस्तू जाळल्यास मोठा दंड आकारण्यात येईल. हवेत निर्माण होणारा धूर हा शहरातील हवा गुणवत्तेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवतो, त्यामुळे या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार :

थंडीचा हंगाम सुरू असूनही शेकोटी पेटवण्यास संपूर्ण मनाई केल्याने अनेक नागरिक नाराज आहेत. विशेषतः रात्री ड्युटी करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसते. मात्र, शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. (Pune bonfire ban)

आगामी काही दिवसात या निर्णयावर नागरिकांची प्रतिक्रिया, सोसायट्यांचा प्रतिसाद आणि नियमांची अंमलबजावणी कितपत कडकपणे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title: Pune Municipal Commissioner Bans Bonfires in Winter; Strict Action for Lighting Fires in Housing Societies and Public Places

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now