पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या! ‘या’ एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवासाला निघण्याआधी यादी चेक करा

On: August 20, 2025 11:29 AM
Diwali Special Train
---Advertisement---

Pune Mumbai train cancelled | गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवांनाही बसला आहे. मंगळवारी रात्रीपासून वाढलेल्या पावसामुळे बुधवारी (20 ऑगस्ट 2025) पुणे–मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियोजित प्रवासापूर्वी गाड्यांची माहिती घेण्याचं आवाहन केलं आहे. (Pune Mumbai train cancelled)

कोणत्या गाड्या रद्द? :

आज पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खालील गाड्या धावणार नाहीत:

११०१० – सिंहगड एक्सप्रेस (पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

११००७ – डेक्कन एक्सप्रेस (पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

१२१२८ – इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस (पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

२२१०६ – इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस (पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

१२१२६ – प्रगती एक्सप्रेस (पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

१२१२४ – डेक्कन क्वीन (पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

२२२२६ – वंदे भारत एक्सप्रेस (सोलापूर–पुणे मार्गे मुंबई)

Pune Mumbai train cancelled | प्रवाशांसाठी प्रशासनाचा सल्ला :

रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे की, सततच्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत माहिती तपासावी. (Pune Mumbai train cancelled)

मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. हवामान लक्षात घेता पुढील काही दिवस गाड्यांबाबतचे अपडेट्स वेळोवेळी दिले जातील.

News Title: Heavy rains disrupt Pune–Mumbai rail services: Deccan Queen, Intercity, Vande Bharat among trains cancelled

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now