पुण्यातील बड्या उद्योजकांना धक्का! पुणे एमआयडीसीने घेतला मोठा निर्णय

On: September 23, 2025 6:06 PM
Pune MIDC
---Advertisement---

Pune MIDC | पुण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) घेतलेल्या एका निर्णयामुळे उद्योगजगतामध्ये खळबळ उडाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा आता महाग झाला असून, या निर्णयावर उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (MIDC water charges hike)

पाणीपट्टीत मोठी वाढ :

मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर 2025 रोजी एमआयडीसीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. याअंतर्गत:

औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 2.75 रुपये वाढ

पाणी कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 28 रुपये वाढ

औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील घरगुती ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 1 रुपया वाढ

यामुळे 1 हजार लिटरसाठी पाणीपट्टी 1 रुपयापासून थेट 28.75 रुपयांपर्यंत वाढली आहे.

Pune MIDC | वाढीमागील कारणं :

एमआयडीसीच्या अभियंत्यांच्या माहितीनुसार, 2013 पासून पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, जलसंपदा विभागाकडून वाढलेली पाणीपट्टी आणि विजेचा खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपट्टीचे नवे दर 1 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले आहेत. (Pune MIDC)

उद्योजकांनी या निर्णयाला अवास्तव आणि अचानक घेतलेला ठरवत तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, तीन ते चार पट वाढ ही उद्योगांसाठी मोठा आर्थिक धक्का आहे. तसेच हा निर्णय घेण्यापूर्वी उद्योग संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे याचा उद्योगांच्या उत्पादन खर्चावर आणि नफ्यावर थेट परिणाम होणार आहे. (MIDC water charges hike)

दरम्यान, या निर्णयामुळे पुणे आणि सांगली परिसरातील लघु व मध्यम उद्योगांना (SMEs) सर्वाधिक फटका बसणार असल्याचे मानले जात आहे. पाणी हे उत्पादन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे, वाढलेल्या खर्चामुळे उद्योगांची स्पर्धात्मकता कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

News Title: Pune MIDC Water Charges Hike 2025 | Industrialists Shocked by Sudden Tariff Increase

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now