Pune Metro तब्बल 36 मिनिटे बंद राहिली, कारण ऐकाल तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

On: January 13, 2024 4:17 PM
Pune Metro
---Advertisement---

Pune Metro | मेट्रोमुळे पुण्यातील नागरिकांच्या वेळेत बरीच बचत झाली आहे. मात्र काल (12 जानेवारी) मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच संताप वाढला. त्याला कारणही तसेच होतं. कारण वीजवाहिनीतील प्रवाह खंडित झाल्याने मेट्रो सेवा (Pune Metro) सायंकाळी तब्बल 36 मिनिटे बंद राहिली. यामुळे सर्वांनाच प्रचंड मनस्ताप झाला.

शुक्रवारी सायंकाळी वीज प्रवाह खंडित झाल्याने मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पुर्ववत होईपर्यंत प्रवासी गाड्यांमध्येच बसून होते. त्यामुळे बऱ्याच जणांचे कामे खोळंबली. दर साडे सात मिनिटाला धावणारी मेट्रो 36 तास बंद पडल्याने प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले.

‘या’ कारणामुळे बंद होती मेट्रो सेवा

वीजप्रवाह बंद असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) ते शिवाजीनगर मार्गावरील पाच गाड्या त्या-त्या स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या. पीसीएमसी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सेवा (Pune Metro) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी येथे एक नाही तर, दर साडे सात मिनिटाला एक मेट्रो धावत असते.

मात्र, काल सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कासारवाडी, नाशिक फाटा (भोसरी) या स्थानकांच्या परिसरात एका तारेतील वीजप्रवाह अचानकच खंडित झाला. त्यामुळे सर्वच सेवा बंद पडून गेल्या. याच दरम्यान, मार्गावर पाच गाड्या धावत होत्या. या गाड्यांना मग वीज बॅकअपच्या साह्याने नजीकच्या स्थानकात थांबवण्यात आल्या. सर्व दरवाजे खुले करण्यात आले. येथे सर्व दरवाजे खुले केले गेले.

36 मिनिटांनी मेट्रो पुन्हा सुरू झाली

यानंतर त्वरित नेमकं काय बिघाड झाला तो शोधून काढण्यात आलाआणि लगेच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यासाठी साधारण 36 मिनिटे लागली. सर्व दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा मेट्रो (Pune Metro) सुरू करण्यात आली. पुढे मग प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू झाला.

या सर्व प्रकरणावर मेट्रोचे जनसंपर्क महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी नंतर प्रतिक्रिया दिली.”पुण्यातील पीसीएमसी ते शिवाजीनगर दरम्यानच्या एका वीज वाहिनीतील प्रवाह खंडित झाल्याने त्या त्या स्थानकात गाड्या (Pune Metro) थांबविण्यात आल्या. प्रवाशांना याची सूचना देण्यात आली. यानंतर लगेच दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर नियमितपणे सेवा सुरू झाली, असे हेमंत सोनवणे म्हणाले.

News Title- Pune Metro was closed for 36 minutes

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट

Join WhatsApp Group

Join Now