गणेशोत्सवात पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मेट्रो प्रशासनाने जाहीर केल्या सूचना

On: August 28, 2025 11:04 AM
Pune Metro Ganeshotsav
---Advertisement---

Pune Metro Ganeshotsav | पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात जल्लोषात झाली असून शहरातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका आणि प्रतिष्ठापना पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शहराच्या मध्यवर्ती भागात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत.

महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे की, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांचा अनुभव सुखकर ठेवण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 2 लाख 15 हजार इतकी आहे. परंतु गणेशोत्सव काळात ही संख्या वाढून 5 लाखांवर जाण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. (Pune Metro Ganeshotsav)

पर्यायी स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन :

स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ ही महत्त्वाची स्थानके गणेशोत्सवात जास्त गर्दीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे मेट्रोने पर्यायी स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवड मनपा ते स्वारगेट मार्गिकेवरील प्रवासी – गणपती दर्शनासाठी कसबा पेठ स्थानक वापरावे. येथून पायी जवळच्या गणेश मंडळांना जाता येईल.

वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील प्रवासी – पुणे महानगरपालिका, छत्रपती संभाजी उद्यान किंवा डेक्कन जिमखाना स्थानक वापरून पुढे पायी जावे.

विशेष म्हणजे मंडई स्थानकावर उतरणे शक्यतो टाळावे, असे मेट्रोकडून सुचविण्यात आले आहे.

Pune Metro Ganeshotsav | प्रवाशांसाठी महत्त्वाचे नियम :

– तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी डिजिटल तिकीट, व्हॉट्सअ‍ॅप तिकीट किंवा ‘वन पुणे कार्ड’ वापरावे.

– लिफ्ट वापरण्यासाठी वृद्ध, महिला आणि गरजू प्रवाशांना प्राधान्य द्यावे; इतरांनी जिने किंवा एस्केलेटरचा वापर करावा.

– स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडताना रांगेने व शिस्तबद्धपणे हालचाल करावी.

– अनावश्यक थांबणे किंवा गर्दी करणे टाळावे. (Pune Metro Ganeshotsav)

– प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

गणेशोत्सवात भाविक आणि प्रवाशांनी पुणे मेट्रो, पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून शिस्त राखावी, असे पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

News Title: Pune Metro Ganeshotsav Update: Special Guidelines for Passengers to Avoid Heavy Rush

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now