बुधवार पेठेत जाणं IT इंजिनिअरला पडलं महागात; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

On: July 17, 2025 5:50 PM
Pune Budhwar Peth
---Advertisement---

Pune Budhwar Peth | पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरी पत्नी नसताना कामानिमित्त बुधवार पेठेत गेलेल्या एका आयटी इंजिनिअर तरुणाचा व्हिडीओ शूट करून त्याला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर ब्लॅकमेलिंगचा नवा फॉर्म्युला वापरून त्याच्याकडून २० हजारांची खंडणी मागितली गेली. मात्र, या तरुणाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण अशी आहेत. या दोघांनी संगनमत करून तरुणाचा पाठलाग केला, त्याला धमकावलं आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सोशल मीडियावरही या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. (Pune Budhwar Peth)

व्हिडीओ शूट, पाठलाग आणि खोट्या आरोपांची धमकी – ब्लॅकमेलिंगचा संपूर्ण कट :

ही घटना १३ जुलै २०२५ रोजी घडली. सिंहगड रोडवरील किरकिटवाडी परिसरात राहणारा विवाहित आयटी इंजिनिअर आपल्या मित्रासोबत बुधवार पेठेत कामासाठी गेला होता. तेव्हा बाईकवर उभा असतानाच आयुष आणि सदफ या दोघांनी त्याचा मोबाईलवर व्हिडीओ शूट केला. त्यानंतर त्यांनी या तरुणाचा नांदेड सिटी येथील घरापर्यंत पाठलाग केला.

घरी पोहोचल्यावर त्या तरुणाला अडवून “तू बुधवार पेठेत का गेला होतास?” असा प्रश्न विचारून व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यानंतर २०,००० रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यास व्हिडीओ पोलिसांना देण्याची धमकी देण्यात आली. मात्र, पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिला.

Pune Budhwar Peth | फसवणूक उलट त्याच्यावरच खोटं आरोप, पण पत्रकाराच्या मदतीनं उलगडला खरा प्रकार :

खंडणी न मिळाल्यामुळे आयुष आणि सदफने पोलिस हेल्पलाइनवर फोन करून उलट त्या तरुणावरच तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, “या तरुणाने आमच्याकडून २० हजार रुपये घेतले आहेत आणि परत देत नाही.” सुरुवातीला पोलीसही त्यांच्यावर विश्वास ठेवत होते आणि त्या तरुणालाच जाब विचारला.

मात्र, या तरुणाने स्थानिक पत्रकाराच्या मदतीने पोलिसांसमोर आपली बाजू सविस्तर मांडली. त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आला की, हा सर्व प्रकार म्हणजे नियोजित ब्लॅकमेलिंग कट आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि आयटी इंजिनिअरची बाजू स्पष्ट केली.

News Title: Pune IT Engineer Blackmailed Over Video Near Budhwar Peth; Duo Arrested by Police

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now