‘या’ बड्या नेत्याला घेण्यासाठी जाताना कोसळलं हेलिकॉप्टर; तीन जणांचा मृत्यू

On: October 2, 2024 10:38 AM
Pune Helicopter Crash
---Advertisement---

Pune Helicopter Crash l पुणे येथील बावधनजवळ आज सकाळी पावणे सातच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी एका हेलिकॉप्टरचा दुर्दैवी अपघात झाला आहे. त्यावेळी दाट धुक्यामुळे बावधनजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या धक्कादायक घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघात झालेल्या हेलिकॉप्टर संदर्भात मोठा खुलासा समोर :

या अपघातामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे. क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं. तर ते हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालं होत. मात्र आज सकाळच्या सुमारास दाट धुके असल्याने या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.

याशिवाय आता या हेलिकॉप्टर संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. पुण्यात अपघात झालेले हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. कारण खासदार सुनील तटकरे यांनी काल म्हणजेच मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.

Pune Helicopter Crash l सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते :

सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला देखील परतले होते. मात्र यानंतर खासदार सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले.

मात्र त्यानंतर आज हेच हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी निघालं होत. मात्र त्याआधीच पुण्य जवळील बावधन येथे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि या घटनेटमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

News Title – Pune News Helicopter Crash

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! पुण्यातील ‘या’ भागात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

“साईबाबा मुस्लिम, त्यांचा हिंदू धर्माशी संबंध नाही”; वाराणसीतील मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

आज सर्वपित्री अमावस्या ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ?, वाचा तुमचं राशीभविष्य

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now