Pune News | पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज (2 ऑक्टोबर) सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर असल्याची माहिती समोर येत आहे. (Pune News )
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा परिसर पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर आहे. आता हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही.
बावधन बुद्रुकमधील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं
ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट येथून हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, डोंगराळ भाग असल्याने येथे धुके जास्त होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं बोललं जातंय. हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतल्याने यात तिघांचा मृत्यू झालाय. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्था या परिसरातील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. (Pune News )
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी येथे हेलिपड उभारण्यात आले आहे.
हा रिसॉर्ट डोंगराळ भागात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात धुके सध्या दिसून येत आहे. पुण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी मागील काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे येथे अजूनही मोठ्याप्रमाणात धुके आहेत. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला असावा आणि हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. (Pune News )
News Title – Pune News Helicopter Crash
महत्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
आज सर्वपित्री अमावस्या ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ?, वाचा तुमचं राशीभविष्य






