गँगस्टर निलेश घायवळ लंडनमध्ये? ‘इथे’ बांधलं आलिशान घर, मुलागाही ‘हायफाय’ शाळेत

On: September 26, 2025 6:02 PM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Nilesh Ghaywal | पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये ऐषोआरामात राहत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. हत्या, खंडणी, अपहरण आणि मारामारी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला घायवळ, पुण्यातील कोथरुड गोळीबार प्रकरणानंतर परदेशात पळून गेला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली असून त्याच्यावर लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. (Nilesh Ghaywal London)

गुन्हे करून कमावला पैसा, लंडनमध्ये घर खरेदी :

निलेश घायवळने गुन्हेगारीतून प्रचंड पैसा कमावला आणि त्यातूनच त्याने लंडनमध्ये आलिशान घर खरेदी केले असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचा मुलगाही सध्या लंडनमधील एका महागड्या शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी सांगितले की, घायवळने (Nilesh Ghaywal London) पासपोर्ट आपल्या कडे जमा केला नाही, त्यामुळे तो देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला.

१७ सप्टेंबर रोजी रात्री कोथरुडमध्ये मुठेश्वर मित्र मंडळासमोर क्षुल्लक वादातून गोळीबार करण्यात आला होता. प्रकाश मधुकर धुमाळ (वय ३६, रा. थेरगाव) हा युवक गंभीर जखमी झाला. त्यानंतर जुन्या वादातून आणखी एका तरुणावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. दोन्ही घटनांनंतर कोथरुड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले.

Nilesh Ghaywal | मकोका अंतर्गत कारवाई :

या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली. आरोपींपैकी काहींना अटक झाली असून घायवळ लंडनला पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, भारतात परतताच त्याला अटक करण्यात येईल.

News title : Pune Gangster Nilesh Ghaywal Flees to London | Builds Luxury House, Son in Elite School | MCOCA Action in Kothrud Firing Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now