Pahalgam Terror Attack l काश्मीरच्या पहलगाम परिसरात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील पुण्यातून गेलेल्या एका पाच जणांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. (Pahalgam Terror Attack)
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांच्या एका व्हॅलीत हे कुटुंब काश्मिरी पोशाख घालून फोटो काढत असताना अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी पहिले पर्यटकांची ओळख विचारली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत थेट गोळीबार केला. असावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे आणि संगीता गाबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे.
दोन पर्यटक ठार, अनेक जखमी; फडणवीसांनी व्यक्त केला तीव्र संताप :
या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप दिसले आणि अतुल मोने यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहिली. फडणवीसांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत संपूर्ण माहिती घेतली. Pahalgam Terror Attack)
दरम्यान, हल्ल्यात पनवेल येथील माणिक पटेल आणि एस. भालचंद्र राव हे दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
Pahalgam Terror Attack l काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली; अमित शाह घटनास्थळी रवाना :
हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) विशेष विमानाने पहलगाम येथे पोहोचले असून, संपूर्ण भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. Pahalgam Terror Attack)
आतापर्यंतच्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






