Pune Drowning Case | धुळवडीच्या सणाला गालबोट लागले आहे. पुण्यातील देहू येथे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, यवतमाळ आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये देखील प्राणहानी झाली आहे. ऐन सणाच्या दिवशी तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. (Pune Drowning Case )
इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू
पुण्यातील देहू येथे घडलेल्या या घटनेत 10 ते 12 मित्रांचा एक गट इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेला होता. दुपारी चारच्या सुमारास सर्व मित्र पाण्यात उतरले, मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास काही जण पाण्याच्या मधोमध गेले.
पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. स्थानिकांनी एकाला वाचवले, पण तिघांचा मृत्यू झाला. मावळच्या वन्यजीव रक्षक पथकाने बचावकार्यात मदत केली.
यवतमाळमध्ये धरणात बुडून एकाचा मृत्यू, एकाचा शोध सुरू
यवतमाळच्या खोरद धरणात रंगपंचमीच्या दिवशी आठ जण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी पाच जण अचानक बुडायला लागले त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर दोन मावस होते यात एकाच मृत्यू झाला तर एकाचा शोध सुरू आहे. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी दोघांची नावे आहे. मृतक पंकज झाडे याचा मृतदेह मिळाला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. (Pune Drowning Case )
महामार्गावर मामा-भाच्याचा अपघाती मृत्यू
तिसऱ्या घटनेत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू झाला. प्रल्हाद माळी (24) आणि मनोज जोगारी (20) हे होळी साजरी करून घरी परतत असताना त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Title : Pune Drowning Case in Indrayani River






