ताडदेवच्या ‘त्या’ वादग्रस्त फ्लॅट प्रकरणात नवा ट्विस्ट; फ्लॅट मालक समोर आल्याने खळबळ!

On: August 13, 2026 2:35 PM
Tardeo Non Veg News
---Advertisement---

Tardeo Non Veg News | ताडदेवमधील एका आलिशान इमारतीत मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना फ्लॅट विकला जात नसल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा शाकाहारी-मांसाहारी या मुद्द्यावरून घर खरेदी-विक्रीचा वाद चर्चेत आला. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून संबंधित फ्लॅटचा मालकच मराठी असल्याची माहिती एजंट भावेश कावरेने दिली आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे ताडदेव प्रकरण चर्चेत :

दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील एका नव्या हाय-राईज इमारतीतील फ्लॅटच्या विक्रीसंदर्भात हा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे हा केवळ शाकाहारी व्यक्तींनाच संबंधित फ्लॅट विकला जाईल, तर मांसाहार करणाऱ्यांना घर दिले जाणार नाही, असा दावा करताना दिसत होता. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात घर खरेदी करताना व्यक्तीच्या खानपानाच्या सवयींचा विचार केला जात असल्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा रंगली. यापूर्वी घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवली परिसरातही शाकाहारी-मांसाहारी किंवा मराठी-गैरमराठी या मुद्द्यांवरून घर नाकारल्याच्या घटना चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे ताडदेवमधील प्रकरणाकडेही सर्वांचे लक्ष लागले.

Tardeo Non Veg News | भावेश कावरेने सांगितला नेमका ट्विस्ट :

व्हायरल व्हिडीओनंतर एजंट भावेश कावरेने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. त्याच्या माहितीनुसार, संबंधित फ्लॅटचा मालक मराठी व्यक्ती असून ते वारकरी होते. आपले घर एखाद्या शाकाहारी व्यक्तीनेच खरेदी करावे, अशी त्यांची इच्छा होती, असा दावा कावरेने केला.

विशेष म्हणजे, संबंधित फ्लॅट एका मराठी व्यक्तीनेच खरेदी केल्याचेही भावेश कावरेने सांगितले. तसेच हा फ्लॅट सर्वात लवकर विकला गेल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान, घराच्या विक्रीमध्ये खानपानाच्या सवयींवर आधारित अटी ठेवण्याच्या मुद्द्यावरून मुंबईत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

News title : Tardeo Non-Veg Flat Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now