Pune Crime | स्वारगेट (Swargate) बसस्थानकातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुणे-सांगली शिवशाही बसमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. आष्टा बसस्थानक ते सांगलीदरम्यान रात्री 11 ते 12:15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. (Pune Crime )
बसमध्ये अश्लील चाळे, महिलेकडून तक्रार दाखल
संशयित वैभव वसंत कांबळे (Vaibhav Vasant Kamble) याने बसमध्ये खिडकीजवळून आणि सीटच्या मधून हात काढून तरुणीला स्पर्श केला व अश्लील वर्तन केले.
सांगली स्थानकात पोहोचल्यानंतर तरुणीने हा प्रकार बसचालक आणि इतर प्रवाशांना सांगितला. यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात महत्वाची अपडेट समोर
स्वारगेट एसटी आगारातील शिवशाही बसमध्ये काही दिवसांपूर्वी बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Ramdas Gade) याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime )
या सलग घटनांमुळे शिवशाही बसमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकार आणि परिवहन विभाग यावर कोणती ठोस उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Title : Pune Crime Woman Harassed in shivshahi bus






